रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (15:08 IST)

वानखेडे मैदानावर अंपायर पॉल रायफल जखमी

मुंबईतल्या वानखेडे मैदानावर भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटीत चेंडू लागल्याने अंपायर पॉल रायफल  जखमी झाले आहेत. त्यामुळे  पॉल यांनी मैदान सोडावे लागले. त्यानंतर  तिसऱ्या अंपायरनी मैदानात धाव घेतली. मग सामन्याला सुरुवात झाली. 48 व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर मोईन अलीने चेंडू टोलवला. सीमारेषेकडे गेलेला चेंडू भुवनेश्वर कुमारने अडवला आणि विकेटकिपर पार्थिव पटेलच्या दिशेने फेकला. मात्र अंदाज आला नसल्याने  भुवनेश्वरने फेकलेला चेंडू लेग अंपायर पॉल रायफल यांच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे पॉल जखमी झाले.