मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (12:37 IST)

विराटने केली रोहितची पाठराखन, पत्रकार परिषदेत असे म्हटले ..

पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवानंतर एका पत्रकार परिषदेत विराट कोहलीला पाकिस्तानी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना सामोरी जावे लागले. या परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांमुळे विराटला धक्काच बसला. या पत्रकार परिषदेत विराटला विचारले की 'ईशान किशन चांगली खेळी खेळत असताना  त्याच्या ऐवजी रोहित शर्मा ला संघात संधी देण्यात आली. संघाची निवड करताना काही चूक केली का? रोहित शर्मा ला संघातून काढावं, असं आपल्याला वाटते का? आपल्याला वादच निर्माण करायचा असेल तर आधीच सांगा, असं म्हणत विराटने पत्रकाराला चोख उत्तर दिले. असा उलट प्रश्न विचारत विराटने पत्रकाराला टोला लगावला