शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (16:56 IST)

'विस्डेन' च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर

क्रिकेटचा धर्मग्रंथ मानल्या जाणा-या 'विस्डेन' च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान विराट कोहलीला मिळाल्याने त्याच्या शिरपेचात एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
 
२०१७ चा अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'विस्डेन'ने अंकाचे मुखपृष्ठ ट्विट केले आहे. विस्डेनच्या अंकात झळकण्याचा मान मिळवणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१४ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 'विस्डेन'ने कव्हर फोटोतून त्याच्या कारकिर्दीला सलाम केला होता.