शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017 (16:29 IST)

ज्या पदार्थांचं सेवन मी करत नाही, त्याची जाहिरात पण नाही

viratk kohali

ज्या पदार्थांचं सेवन मी करत नाही, त्यांची जाहीरात करुन लोकांना तो पदार्थ वापरण्याचा सल्ला देणं मला पटत नाही. पेप्सी कंपनीची ऑफर नाकारल्यानंतर मला अनेक कंपन्यांकडून जाहीरातीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यांना हो म्हणावं असं मला वाटलं नाही. कोणत्याही खेळाडूसाठी शितपेय ही योग्य नसल्याचंही विराट कोहलीचं मत आहे.

विराट कोहली हा आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चँलेजर्स बेंगलोर या संघाकडून खेळत होता. या संघाचा मालक विजय मल्ल्या याच्या ‘किंगफीशर’ या ब्रँडची जाहीरात करत होता. “मात्र मी दारुची जाहीरात कधीच करत नसल्याचं विराटने आवर्जून नमूद केलं. मी फक्त एनर्जी ड्रिंकची जाहीरात केली असल्याचं विराट म्हणाला.” नुकतच फोर्ब्स मासिकाच्या, सर्वाधीक कमाई करणाऱ्या १०० खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश करण्यात आला होता.