बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

स्वत:वर विश्वास असणे गरजेचे: विराट

नागपूरमधील टी-20 सामन्यात थरारक विजय मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजांचे खास कौतुक केले. त्याचवेळी विराट असेही म्हणाला की स्वत:वर विश्वास असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या 144 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला फक्त 139 धावा करता आल्या.
 
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, या खेळपट्टीवर फटेक मारणे कठीण होते. मी बाद झाल्यानंतर लोकेशला कळले की त्याला शेवटपर्यंत टिकून राहणे गरजेचे आहे. बुमरा आणि नहेराने शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बुमराहने शेवटच्य षटकात अप्रतिम गोलंदाजी केली.