1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (11:45 IST)

WPL 2024 : RCB ने 60 लाखांना एकता बिश्तचा समावेश करून 7 खेळाडू खरेदी केले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी लिलावात खेळाडूंची खरेदी करून आपला संघ पूर्ण केला आहे. या लिलावात बंगळुरूने 7 खेळाडू विकत घेतले आहेत.लिलावापूर्वी, फ्रँचायझीने 7 खेळाडूंना सोडले होते आणि संघाकडे 3.35 कोटी रुपये शिल्लक होते. मिनी लिलावात संघाकडे एकूण 10 रिक्त जागा होत्या, ज्या संघाने आता भरल्या आहेत.आरसीबीने एकता बिश्तसाठी सर्वाधिक 60 लाख रुपये खर्च केले. 
 
आरसीबीने खेळाडू खरेदी केले
 
जॉर्जिया वेअरहॅम - 40 लाख रुपये
केट क्रॉस- 30 लाख रु
एकता बिष्ट – 60 लाख रुपये
शुभ सतीश- 10 लाख रु
सिमरन बहादूर- 30 लाख रु
एस मेघना – 30 लाख रुपये
सोफी मोलिनक्स - 30 लाख रु
 
आरसीबीचे संपूर्ण संघ -
स्मृती मानधना, आशा शोभना, दिशा कसाट, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, सोफी डिव्हाईन, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, एकता बिष्ट, शुभा सतीश, एस मेघना, सिमरन, एस. , सोफी मोलिनक्स.
 
Edited by - Priya Dixit