1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Yuvraj singh, ICC champions trophy final

युवराजचा अनोखा विक्रम

ओव्हल- भारत- पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल लढतीत युवराजने मैदानात येताच आपल्या नावावर एक जागतिक विक्रम कायम केला आहे. युवराजने आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सातव्यांदा खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
 
एवढ्यावेळी फायनलमध्ये खेळणारा तो एकुलता एक खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा त्यासोबतच महेला जयवर्धने यांच्या नावावर युवराजच्या आधी हा ‍विक्रम होता. या सर्वांनी आयसीसी फायनलच्या सहा-सहा सामान्यांमध्ये खेळ केला आहे. पाकिस्तान विरोधात मैदानात उतरताच युवराजने सातव्यांदा अंतिम सामन्यात खेळण्याची किमया साधली.
पुढील लेख
Live Suicide : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन केली प्रियकराने आत्महत्या