1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आज किंग विरुद्ध दादा!

आज किंग विरुद्ध दादा
PR
कोलकत्त्याचे 12 सामन्यांनंतर 14 गुण आहेत. त्यांची शेवटची 14 वी लढत मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. आज कोलकत्ता पराजित झाल्यास किंग्ज इलेव्हन पंजाब खूष होईल. कोलकत्त्याच्या कामगिरीत कमालीचे चढउतार आहेत. त्यातच त्यांनी रॉयल चॅलेंजर्सविरुद्धची यापूर्वीची लढत गमावली आहे; मात्र गौतम गंभीर, जॅक्‍स कॅलीस, मनोज तिवारी, युसूफ पठाण, इऑन मॉर्गनची फलंदाजी; तसेच युसूफ पठाण व इक्‍बाल अब्दुलाची प्रभावी गोलंदाजी ही त्यांची भक्कम बाजू आहे. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पुण्याविरुद्ध ते नक्कीच हुकूमत राखू शकतात.

युवराज सिंग कर्णधार असलेल्या संघाच्या कामगिरीत सौरव गांगुलीच्या समावेशानंतर फारसा प्रभाव पडलेला नाही; पण उद्याची परिस्थिती वेगळी असेल. गांगुली अधिक जिद्दीने उद्याच्या लढतीसाठी मैदानात उतरेल. त्याचबरोबर आपल्या "घरच्या' मैदानावरील अखेरच्या लढतीत विजय मिळविण्याचा पुण्याचा प्रयत्न असेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा