1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आयपीएलमध्ये गांगुलीची वापसी!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या समर्थकासाठी आता चांगली बातमी आहे. इंडियन प्रिमीयर लिगच्या चौथ्या सत्रासाठी गांगुली आता पुणे वॉरियर्सकडून खेळणार आहे. त्याला जखमी गोलंदाज आशिष नेहराच्या जागेवर संघात स्थान मिळाला आहे.

आयपीएलच्या चौथ्या सत्रासाठी झालेल्या लिलावात सौरव गांगुलीसाठी कोणत्याच संघाने बोली लावली नाही. यामुळे चौथ्यासत्रात सौरवच्या खेळण्यावर पूर्णविराम लागला होता. यापूर्वी सौरव गांगुली कोची टस्कर्सकडून खेळणार असल्याचा बातम्याही आल्या होत्या. असे ही म्हटले जात होते की श्रीलंकन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर कोच्चीच्या कर्णधारपदाची जबाबदारीही गांगुली पेलू शकतो. पण असे होऊ शकले नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा