गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated :मुंबई , सोमवार, 11 एप्रिल 2016 (16:17 IST)

आयपीएलला पिण्याचे पाणी नाही..नाही..नाही.. : मुख्यमंत्री

devendra fadnavis
क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी बेहत्तर पण, आयपीएलसाठी राज्यातील पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
 
मुंबईसह नागपूर आणि पुणे येथेही खेळल्या जाणार्‍या २0 सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वापरले जाणार असल्याने हे सामने राज्याबाहेर हलवावेत, अशी याचिका एका सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात केली आहे. राज्य सरकार, आयपीएलच्या आयोजकांवर ताशेरे ओढताना आयपीएलसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
 
मात्र, आयपीएलच्या शनिवारी मुंबईत होणार्‍या पहिल्या सामन्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. आता राज्य शासनाच्या भूमिकेवर या सामन्यांचे पुढील भवितव्य ठरणार आहे.