1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

इंग्लंडचा दणदणीत विजय!

झहीरसारख्या हुकमी अस्त्र असलेल्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीत बोथट झालेली गोलंदाजी, भक्कम सलामीवीराची कमतरता, डळमळीत फलंदाजी, निष्प्रभ फिरकी गोलंदाजीच्या परिणामी एकत्रित परिणामातून कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाला ट्रेंट ब्रिजची दुसरी कसोटीही गमवावी लागली. तब्बल ३१९ धावांनी आणि एक दिवस राखून इंग्लंडने या सामन्यात दणदणीत विजय मिळवित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २ - ० अशी आघाडी घेतली आणि निदान मालिका गमावणार नाही, यावर शिक्कामोर्तब केले.

6 बाद 441 धावसंख्येवरून इंग्लंड संघाने आपला डाव पुढे सुरू केल्यानंतर त्यांनी एकुण 544 धावा करून भारतापुढे 478 धावांचे आव्हान ठेवले. परंतु इंग्लंडच्या टीम ब्रेसनन, अँँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजांनी भारताच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचू दिले नाही. भारताकडून सचिन तेंडुलकरने 56, हरभजन सिंगने 46 व प्रविणकुमारने 25 धावा केल्या. भारतीय संघाचा डाव 47.4 षटकांत 158 धावांवर संपुष्टात आला.

तत्पूर्वी, ब्रेसननने मॅट प्रायर (73) याच्या साथीने 20 षटकांत 119 आणि ब्रॉड (44) याच्याबरोबर अवघ्या 13 षटकांतच 82 धावांची भागीदारी केली. त्यामुळे यजमान संघाला दुसर्‍या डावात 544 धावा फटकावता आल्या. याशिवाय इयान बेलने 159, इयान मॉर्गनने 70 व केव्हिन पीटरसनने 63 धावांची खेळी केली. भारतातर्फे प्रवीण कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 124 धावांत 4 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी उपाहारापर्यंत राहुल द्रविड (06) याची विकेट गमावून आठ धावा केल्या. त्याला स्टुअर्ट ब्रॉडने यष्टीरक्षक प्रायरकरवी झेलबाद केले.

भारताची स्थिती यापेक्षाही वाईट झाली असती; परंतु जेम्स अँडरसनच्या डावातील पहिल्याच चेंडूवर ब्रेसननने अभिनव मुकुंदचा झेल सोडला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा लक्ष्मण (0) आणि अभिनव मुकुंद (2) खेळत होते.
धावफलक :
इंग्लंड पहिला डाव : 221, दुसरा डाव : 544; भारत पहिला डाव : 288, दुसरा डाव 158
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा