Last Modified: नवी दिल्ली , रविवार, 28 नोव्हेंबर 2010 (10:34 IST)
इरफानचे कॅटवॉक!
भारतीय क्रिकेटपटू खराब फॉर्ममुळे जरी संघाबाहेर असले तरी त्यांच्या प्रसिद्धीत तिळमात्र कमी झाली नाही. इरफान पठाण सध्या संघाबाहेर असल्याने तो रँम्प व कॅटवॉक करण्यात वेळ घालवत आहे.
दिल्लीत झालेल्या एका फॅशन शोमध्ये त्याने हे कॅटवॉक केले. रीबॉक आणि अरमानी ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
चमचमणारे जॅकेट आणि पँट अशा पोशाखात इरफानने कॅटवॉक केले. स्पोर्ट आणि स्टाईल असा लूक या ड्रेसला देण्यात आला आहे.