1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

कोचीचा एकतर्फी विजय!

ND
ब्रॅड हॉजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोची टस्कर्सने राजस्थानच्या पराभव केला. अवघ्या 13 धावा देत त्याने राजस्थानचे चार गडी तंबूत पाठविले. एवढेच नव्हे, तर त्यानचे विजयासाठी नाबाद 33 धावांची खेळीही केली. त्याची ही लक्षवेधी कामगिरीच सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. हॉजच्या चार धक्क्यांमुळे राजस्थानचा डाव अवघ्या 97 धावांवरच संपला. हे सोपे आव्हान कोची संघाने 7.2 षटकांत 2 गडी गमावून गाठले.

बॅडन मॅक्क्यूलम आणि कर्णधार जयवर्धने यांनी कोचीला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण, ओरमच्या चेंडूवर जयवर्धेने (6) चौहानकरवी ङोलबाद झाला. ब्रॅडनने 12 चेंडूत 29 धावा केल्या. त्यानंतर पार्थिव पटेल आणि ब्रॅड हॉज या जोडीने शानदार फटकेबाजी केली. पार्थिववने अवघ्या 14 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने हॉजसोबत 53 धावांची भागिदारी केली. हॉजने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत 33 धावा केल्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा