चेन्नईची विजयी सलामी!
ND |
कोलकत्याने 154 धावांच्या आव्हानासमोर 2 बाद 112 अशी दमदार वाटचाल केली होती; मात्र भरवशाचा जॅक् कॅलिस (54) बाद होताच त्यांची घसरगुंडी उडाली. कॅलिसचा अडथळा अश्विनने दूर केला. अखेरीस त्यांना 7 बाद 151 अशी मजल मारता आली. सूरज रणदीवने टाकलेल्या 19व्या षटकात मनोज तिवारीने (27) दोन षटकार, तर लक्ष्मीरतन शुक्लाने एक चौकार मारला. या षटकात 17 धावा गेल्या. मात्र, रणदीवने तिवारी बाद करीत चेन्नईच्या आशा कायम राखल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती. धोनीने हे षटक न्यूझीलंडच्या टीम साउदीला दिले. त्याने दुसऱ्याच चेंडूवर शुक्लाला (14) बाद केले.
