1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

भारताचा विंडीजवर जोरदार विजय!

ND
इशांत शर्मा व प्रवीण कुमारच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्या कसोटीत 63 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा वेस्ट इंडीजविरुद्ध हा 12 वा आणि त्यांच्या भूमीवर 5 वा विजय आहे. तसेच धोनीच्या नेतृत्वाखालील भारताचा हा कसोटीतील 15 वा विजय आहे. त्याच्याआधी केवळ गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 26 विजय मिळवले आहेत.

भारताने विजयासाठी दिलेले 326 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडीजला पेलवले नाही आणि त्यांचा संघ 68.2 षटकांत 262 धावांत गारद झाला. वेस्ट इंडीजतर्फे डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक 41, अँड्रियन बराथने 38, रामपॉलने 34 व चंद्रपॉलने 30 धावा केल्या. भारतातर्फे प्रवीण कुमार आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यांना अमित मिर्शाने 2 आणि हरभजन व रैनाने प्रत्येकी 1 गडी बाद करीत साथ दिली. वेस्ट इंडीजने 3 बाद 131 या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला. मात्र, प्रवीण कुमारने भारताला जबरदस्त सुरुवात करुन देताना युवा फलंदाज डॅरेन ब्राव्हो (41) याला बा केल्यानंतर अनुभवी शिवनारायण चंद्रपॉल (30) याला तंबूत धाडताना भारताच्या विजयाचा मार्ग सुकर करून सुरेश रैनाने देवेंद्र बिशूचा त्रिफळा उडवताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा