1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

राजस्थान रॉयल्स 'फिनिश'

लक्ष्मी रतन शुक्ल आणि अजित आगरकर यांच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळाच्या जोरावर आज राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थानकडून विजय खेचून आणल्याने आता सेमीफायनलमध्ये खेळण्याच्या राजस्थानच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. शुक्लाला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. धावफलक पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मैदानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानचा अख्खा संघ केवळ 101 धावत गारद झाल्याने कोलकाताच्या पुढ्यात केवळ 102 धावांचे लक्ष होते.

या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा अर्धा संघ 10 षटकांमध्ये 38 धावांतच तंबूत परतल्याने राजस्थानचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु यानंतर मैदानावर उतरलेल्या अजित आगरकर आणि लक्ष्मीरतन शुक्ल या जोडीने संयमी खेळी करत राजस्थानच्या खिशातून हा सामना खेचून आणला आणि कोलकाताला 14 सामन्यांमध्ये तिसरा विजय साजरा करता आला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा