रॉयल्सचा मुंबईवर विजय
मुंबई इंडियन्सला अवघ्या 94 धावांत रोखणार्या राजस्थान रॉयलस्ने नंतर 7 विकेटने शाही विजय साजरा केला. 7 लढतींमधील मुंबईचा हा दुसरा पराभव आहे. तर राजस्थानने 8 लढतीत चौथ्या विजयाची नोंद केली. 6 धावांत 3 विकेट आणि 39 चेंडूत 45 धावा ठोकणार जोहान बोथा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. 8 बाद 94 हा मुंबईचा आयपीएलमधील सवर्सात कमी स्कोर ठरला. मुंबईकडून सर्वाधिक 17 धावा सायमंड्सने केल्या. सचिनला सात धावा करता आल्या.
विजयासाठी आवश्यक 95 धावा राजस्थानने अगदी आरामात पूर्ण केल्या. पाचव्या षटकात द्रविड (5) बाद झाल्यावर बोथाने (3 चौकार आणि 1 षटकार) प्रथम वॅटसनसमवेत दुसर्या विकेटसाठी 39 व मनेरिया (नाबाद 13) सह तिसर्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. विजयासाठी 4 धावांची गरज असताना बोथाला मुनाफने बाद केले.