लक्ष्मण टॉप टेनमध्ये
भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने वेस्ट इंडीजविरुद्ध दुसर्या कसोटीत सलग दोन अर्धशतके झळकवून आयसीसी कसोटी मानांकनात सात स्थानांची बढती मिळवली व तो सहाव्या स्थानापर्यंत पोचला.
या सामन्यात छत्तीस वर्षीय लक्ष्मणने ८५ व ८७ धावांची खेळी करताना सेहवाग आणि वेस्ट इंडीजच्या चंद्रपॉलला मागे टाकले. या क्रमवारीतील पहिले पाच क्रमवारीत बदल झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज जॅक कॅलिस अग्रभागी असून सचिन तेंडुलकर दुसर्या मानांकनावर आहे.