1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

सचिनला ''भारतरत्न'' मिळावा!

सचिनला भारतरत्न मिळावा
WD
विश्वचषक जिंकण्याचे विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचे स्वप्न २ एप्रिलला पूर्ण झाले असून, आता सचिनला 'भारतरत्न' मिळावा हे तमाम भारतीयांचे स्वप्नही साकार व्हावे, यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने हालचाल सुरू केली आहे. 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मानासाठी सचिनच्या नावाची शिफारस केंद्राला करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

या ठरावाला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पाठाइबा देत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गेली २१ वर्षे क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजविणारा सचिन तेंडुलकर खर्‍या अर्थाने भारताचे रत्न आहे. म्हणूनच त्याला 'भारतरत्न' किताबाने गौरविण्यात यावे, असे सार्‍यांनाच वाटत आहे. क्रिकेटविश्वातील अनेकानेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर 'माणूस' म्हणूनही खूप मोठा आहे. अप्रतिम खेळ आणि नम्र स्वभावामुळे सचिनने देश-विदेशातील असंख्य क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य केले आहे.

त्याची ही कारकीर्द पाहता, त्याला भारतरत्न किताब बहाल करण्यात यावा, अशी शिफारस केंद्राकडे करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा