Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोर चोर चोर...

Updated: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (10:40 IST)
 
त्याची नजर एका बाईकडे गेली. त्याने आजूबाजूला पाहिलं. लोक आपल्याच कामात व्यग्र होते. त्या बाईने पर्समधून पैसे काढले आणि भाजीवाल्याला पैसे दिले. तसा तो मुलगा सावध झाला. त्याने संधीचा फायदा घेत त्या बाईच्या हातातली पर्स हिसकावली आणि तो पळू लागला... त्या बाईने लगेच चोर चोर चोर असं ओरडायला सुरुवात केली. मुलगा जोरात पळत असतानाच सतर्क असलेल्या नागरिकांनी त्याला पकडलं. त्या मुलाला मारू लागले. 
 
ती बाई जवळ आली, तिला पर्स मिळाली. तिनेही त्याच्या दोन मुस्कटात मारलं. लोक इतके भडकले होते की जणू आता ते त्या मुलाचा जीवच घेतील. तेवढ्यात गर्दीतून एक देखणा माणूस समोर आला आणि म्हणाला का मारताय या मुलाला? लोकांनी करण्याचं कारण सांगितलं, तो देखणा माणूस म्हणाला या मुलाचं चुकलंच. पण त्याने चोरी केली पोटासाठी. असे कितीसे पैसे होते तुमच्या पर्समध्ये. बाई म्हणाली हजार रुपये तरी असतील. 
 
तो माणूस म्हणाला या मुलाने हजार रुपये चोरले म्हणून तुम्ही याचा जीव घ्यायला निघालात. पण इतकी वर्षे ज्यांनी आपले इतके पैसे चोरले त्यांना तुम्ही साधा जाब तरी विचारला का? की तुम्ही भ्रष्टाचार का केला? तुम्ही त्यांच्यावर हात सोडा पण त्यांना एक साधं पत्र तरी धाडलंय का? कमलनाथ ह्यांच्या नीकटवर्तीयांकडे इतके पैसे सापडले, देशात लवासा, बोफोर्स, स्पेक्ट्रम, नॅशनल हेराल्ड, अगस्ता वेस्टलँड इतके घोटाळे झाले तुम्ही एकदा तरी यासाठी रस्त्यावर उतरलात का? नाही ना? मग या मुलावर हात उगारण्याची तुमची लायकी नाही. सर्व माणसे खजील झाली. सर्व जण मागे फिरू लागले. देखणा माणूस म्हणाला आजही असेच गप्प निघून जाणार का? तर ती बाई म्हणाली नाही... आम्ही मतदान करायला चाललोय. सुरक्षित, प्रगत, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि विकासाला मतदान करणार... तो देखणा माणूस खुश झाला. 
 
माणसाने मुलाला विचारले शाळेत जाणार? मुलाने होकारार्थी मान हलवली. माणूस म्हणाला मोठं होऊ काय व्हायचंय तुला. मुलगा म्हणाला मला पोलीस व्हायचंय. देश लुटणाऱ्यांना आत टाकणार...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला

LIVE: महाराष्ट्र सरकारने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई करत सामग्री जप्त केली

ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या नियमांवर घेतला महत्त्वाचा निर्णय, दोन महत्त्वाच्या आदेशांवर स्वाक्षरी केली

आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली; अनेक मुद्द्यांवर चर्चा

पुढील लेख
Show comments