Marathi Biodata Maker

फेस्टिव्हल सिझनमध्ये शॉपिंग करताना..

Updated: सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (12:05 IST)
 
यादी तयार करणे : शॉपिंग करण्याअगोदर खरेदी करण्यात येणार्‍या सामानाची यादी करणे गरजेचे आहे. जेणेकरून ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्याचीच खरेदी करण्यास आपण प्राधान्य देऊ. सामानाची यादी सोबत असल्याने विसरण्याचा धोका राहत नाही. यातून आपल्याला किती खर्च अपेक्षित आहे, याचा अंदाज काढता येतो आणि त्यानुसार पैसे बाळगता येतात. बाजारात गर्दी खूप असते. मॉल, दुकानात लोकांना पाय ठेवायला जागा नसते. अशा गोंधळात एखादी वस्तू विकत घेण्याचे राहून जाते. त्यामुळे यादी असेल तर आपण खरेदी करताना आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करता येतो.
 
ऑफरचा लाभ घ्या : उत्सवाच्या दिवसात बहुतांश कंपन्या सेल, डिस्काऊंट, ऑफर जाहीर करतात. मग ती इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा मोटार असो. मॉलमध्ये, कपडय़ाच्या दुकानातही सेल लागलेला असतो. दोन शर्ट विकत घेतले तर एक शर्ट मोफत यासारख्या असंख्य जाहिराती किंवा सेल आपल्याला पाहावयास मिळतात. अशा सेलचा आपण चांगला फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगल्या सामानाची खरेदी होऊ शकते. या कपडय़ांची किंवा वस्तूंचा दर्जाही चांगला असतो. सणाच्या निमित्ताने बाजारात नवीन स्टॉक आलेला असतो. त्यामुळे हा व्यवहार आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. 
 
ऑफ सिझन शॉपिंग बेस्ट: ऑफ सिझन शॉपिंग करणे हे काही मंडळींना रुचणार नाही मात्र त्याचा फायदा चांगला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जसे की हिवाळा संपल्यानंतर दुकानात विंटर कलेक्शन सुरू राहतो. या दरम्यान किमतीतही 30 ते 40 टAके सवलत दिलेली असते. यासाठी आपण ऑफ सिझन खरेदी करू शकता. मात्र याची एकमेव अडचणीची बाब अशी की, पुढील हिवाळा येईपर्यंत आपले पैसे अडकून पडतात. 
 
बजेट निश्चित करा : जेव्हा आपण शॉपिंग करत असतो तेव्हा बजेटकडे लक्ष देत नाहीत. यासाठी आपण शॉपिंगसाठी बजेट निश्चित करायला हवे. त्यामुळे आपल्याला ऐनवेळी हिशेब करताना गोंधळ उडणार नाही. आपल्या खरेदीचा अंदाज ध्यानात घेऊन खर्चाचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे.
 
कुपन्सचा लाभ घ्या : अनेक मंडळींवर कुपन्स पडलेले असतात, मात्र त्याचा वापर करत नाहीत. कारण आपल्याकडे कुपन्स आहेत, हे विसरून गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा एखादे कुपन मिळते तेव्हा त्याचा लाभ अगोदर घेणे गरजेचे आणि वेळेअगोदरच तो घेतला पाहिजे.
 
ऑनलाइनपासून सावध राहा: जी मंडळी ऑनलाइन शॉपिंग करतात त्यांनी त्यावरील वस्तूंची चांगली माहिती घेऊनच खरेदी करायला हवी. कारण आजकाल अनेक वस्तूत दर्जा राखला जात नाही आणि त्याची खात्री देता येत नाही. तसे प्रकारही उघडकीस आले आहेत. उदा. मोबाइल खरेदी केल्यानंतर विट पाठविली जाते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. कॅश ऑन डिलिव्हरीलाच प्राधान्य द्यावे. कुरियरमधून मागविलेली वस्तू आल्यानंतरच संबंधितासमोरच ते पॅक फोडावे आणि खातरजमा करून घ्यावी. नंतर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.

मेघना ठक्कर 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षणमंत्री होणार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा दावा

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, राष्ट्रपतींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली; म्हणाले-सरकारने तरुणांच्या शक्तीपुढे मान झुकवली

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या आईची भेट घेतल्यानंतर मंत्री अदिती तटकरे भावुक

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची मुलाच्या विजयावर भावनिक प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments