Festival Posters

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:49 IST)
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
 
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
 
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
 
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
 
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: मुंबईतील ५३७ 'चाळ' रहिवाशांना 'म्हाडा' आधुनिक पुनर्वसन सदनिकांचा ताबा सुपूर्द करणार

Maharashtra Board Exam 2027 इयत्ता १० वी आणि १२ वीचे प्रश्नसंच आता ऑनलाइन पाठवले जाणार; शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

मोठी घडामोड: दिलीप वळसे-पाटील अचानक 'सिल्व्हर ओक'वर; शरद पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक डॉक्टरसह दोघांना अटक

ठाणे : ४ वर्षांच्या मुलाच्या आईचा प्रियकर बनला शत्रू बनला; चिमुकल्याला दिला वेदनादायी मृत्यू

पुढील लेख
Show comments