नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. लवकरच काही पदांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड इथे भरती होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर भरती महिला सफाई कर्मचारी या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे. महिला सफाई कर्मचारी – एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असावं. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. या पदांसाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज दाखल करावेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 9,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. अशी होणार निवड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. नोकरीचं ठिकाण परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201 आवश्यक कागदपत्र बायोडेटा दहावीचे शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) अर्ज पाठवण्याचा पत्ता परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201