सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:56 IST)

रिटेल मॅनेजमेंटची हटके वाट

रिटेल मॅनेजमेंट ही मॅनेजमेंटमधली तुलनेने नवी शाखा आहे. देशभरात सुपर आणि हायपर मार्केट्‌सची संख्या वाढत आहे. या मार्केट्‌सचं व्यवस्थापन म्हणजे रिटेल मॅनेजमेंट. गेल्या दशकभरात भारतात रिटेल उोगाने मोठी भरारी घेतली आहे. सध्या अशाच मार्केट्‌सची चलती असते. त्यामुळे रिटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम करिअर करू शकता. कॅट परीक्षा देऊन दर्जेदार मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. जीमॅट ही परीक्षा देऊन तुम्ही परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकता. कमॉडिटीज, सेल्स मार्केट तसंच व्यवसायाशी संबंधित विविध संकल्पनांची आवड असेल तर रिटेल मॅनेजमेंट करायला हरकत नाही.
 
ही मॅनेजमेंटमधली नवी शाखा आहे. त्यामुळे आपली आवड आणि कल लक्षात घेऊनच पुढे जायला हवं. मॅनेजमेंटची पदवी मिळवल्यानंतर समोर अनेकविध पर्याय खुले होतात. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही रूजू होऊ शकता. सेल्स किंवामार्केटिंग मॅनेजर म्हणूनही तुम्ही काम करू शकता. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही स्वतःचा रिटेल व्यवसाय सुरू करू शकता. सुरूवातीला तुम्ही 15 ते 25 हजार रूपये महिना उत्पन्न मिळवू शकता. त्यात पदोन्नतीप्रमाणे वाढ होत जाते. सध्या आंतरराष्ट्रीय कंपन्याही भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतील.