मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (10:22 IST)

NHPC मध्ये 10 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी अप्रेन्टिसशिप पदांवर भरतीसाठी अर्ज करा

NHPC Apprentice Recruitment 2020: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन(एनएचपीसी), हिमाचल प्रदेशाने अप्रेन्टिसशिप च्या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, अप्रेन्टिसशिप साठी एकूण रिक्त पदांची संख्या 50 आहे. ही भरती  प्रशिक्षण सत्र 2021-2022 साठी आहे. 
 
एनएचपीसी अप्रेन्टिसशिप भरती मध्ये अर्ज करू इच्छुक उमेदवार 24 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना या apprenticeshipindia.org संकेत स्थळांवर भेट द्यावी लागेल. 
शैक्षणिक पात्रता - एनएचपीसीनुसार, आयटीआय आणि 10 वी उत्तीर्ण उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अप्रेन्टिसशिप साठी पात्र उमेदवारांची यादी www.nhpcindia.com वर प्रकाशित केली जाईल.
वयो मर्यादा - 18 -30 वर्ष 
अर्ज फी - कोणते ही शुल्क आकारले जाणार नाही.
वेतनश्रेणी -  भारत सरकारच्या अप्रेन्टिसशिप कायद्यानुसार देय.
 
अर्ज प्रक्रिया कशी करावी- 
अर्जदार या संकेत स्थळांवर apprenticeshipindia.org नोंदणी करून त्याची प्रिंटआऊट घ्या. या नोंदणीची प्रिंट आऊट शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह स्वतःची साक्षांकित प्रत, आयआयटीची मार्कशीट आणि प्रमाणपत्राची प्रत, निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड प्रत इत्यादी नोंदणी अर्जासह, स्पीडपोस्ट/नोंदणीकृत पोस्ट किंवा स्वतः 15 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेच्या पूर्वी खालील पत्त्यावर पाठवा.
 
उप महाप्रबंधक (एचआर), 
पारबती- II एचई प्रोजेक्ट,
नागवां, मंडी
जिला- कुल्लू, हिमाचल प्रदेश, 
पिनकोड- 175121
 
भरतीची जाहिरात येथे बघा- 
NHPC Apprentice Recruitment 2020 Notice