सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (10:31 IST)

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघाल्या आहे भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) मध्ये बंपर अश्या भरत्या निघाल्या आहे, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारखेला आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. इथे मॅनेजर, डिप्टी मॅनेजर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, सिनियर कन्सल्टन्ट, सीनियर कंसल्टेंट एनालिस्ट(वरिष्ठ सल्लागार विश्लेषक), असिस्टेंट जनरल मैनेजर( सहाय्यक महाप्रबंधक), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर(डेटा संरक्षण अधिकारी) आणि रिस्क स्पेशालिस्ट(जोखीम विशेषज्ञ) या पदांसाठी बंपर भरत्या निघाल्या आहेत. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची मुदत 8 ऑक्टोबर 2020 आहे.
 
पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवारांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in/careers जाऊन अर्ज करू शकतात. या सर्व पदांच्या भरतीसाठी SBI ने काही अधिसूचना जारी केल्या आहेत. उमेदवारांनी त्या सूचनांना सविस्तारपणे वाचुन घ्यावं.
 
जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2020-21/22 मध्ये डिप्टी मॅनेजर(डेटा सायंटिस्ट), मॅनेजर(डेटा सायंटिस्ट) आणि डिप्टी मॅनेजर(सिस्टम ऑफिसर)पदांसाठी भरती करण्यात येत आहे. डिप्टी मॅनेजर(डेटा सायंटिस्ट) साठी एकूण 11, मॅनेजर (डेटा सायंटिस्ट) पदासाठी एकूण 11, आणि डिप्टी मॅनेजर साठी (सिस्टम ऑफिसर) पदासाठी एकूण 5 पदे रिक्त आहेत.
 
त्याच प्रमाणे जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2020-21/21 मध्ये एकूण 5 रिक्त पद रिस्क स्पेशॅलिस्ट सेक्टर स्केल -3 , एकूण 5 रिक्त पद रिस्क स्पेशॅलिस्ट सेक्टर स्केल - 2 , एकूण 3 पद पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशालिस्ट स्केल -2, एकूण 2 पद रिस्क स्पेशॅलिस्ट क्रेडिट स्केल-2 , एकूण 2 पद रिस्क स्पेशॅलिस्ट क्रेडिट स्केल- 3, एकूण 1 पद रिस्क स्पेशॅलिस्ट एंटरप्राईज स्केल -1 आणि एकूण 1 पद रिस्क स्पशॅलिस्ट INDAS स्केल- 3 साठी आहे.
 
जाहिरात क्रमांक  CRPD/ PDRF/ 2020-21/25 मध्ये एक रिक्त पद डेटा ट्रेनर,एक रिक्त पद डेटा ट्रान्सलेटर, एक रिक्त पद सिनियर कन्सल्टन्ट एनालिस्ट आणि एक रिक्त पद असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी आहे. 
 
त्याच प्रमाणे जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2020-21/26 मध्ये एकूण 28 रिक्त पद डिप्टी मॅनेजर (सुरक्षा), एकूण 5 रिक्त पद मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स) पदासाठी निघाल्या आहेत. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या सर्व पदांवर अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत सूचना आवर्जून वाचावी.