शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (11:08 IST)

SSC Job Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन मध्ये 1000 हुन अधिक पदांसाठी भरती , त्वरा करा

govt jobs
SSC Job Recruitment 2023: चांगल्या पगाराची नौकरी चा शोध असणाऱ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत नौकरीची सुवर्ण संधी आहे. अधिकृत संकेत स्थळांवर अधिक माहिती देण्यात आली आहे. या पदासाठी एकूण 1876 रिक्त पद भरले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी करावी लागणार. 
 
तपशील -
पदांचा तपशील -
पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (पुरुष)  -109 पदे   
दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (महिला) - 53 पदे 
 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) -1714 पदे 
 
पात्रता- 
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. 
दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (केवळ पुरुष) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचण्या पूर्ण केले असावे. 
उमेदवारांकडे LMV (मोटर सायकल आणि कार) साठी वैध ड्रायव्हिंग परवाना असावा. 
 
वयोमर्यादा- 
उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देणार .
 
अर्ज शुल्क- 
जनरल आणि ओबीसी उमेदवारांना-100 रुपये 
एससी/एसटी/ महिला उमेदवारांना -शुल्क मध्ये सवलत 
 
वेतनमान- 
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार, 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत पगार मिळणार.
या व्यतिरिक्त उमेदवारांना 6व्या पे स्तर वेतानुसार मूळ वेतन अतिरिक्त अन्य भत्ते देखील दिले जातील. 
 
 
Edited by - Priya Dixit