Dharma Sangrah
✕

ब्रँडेड कपडे खरेदी करताना या पद्धतीने तपासणी करा

Updated: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:36 IST)
 
1 स्टिचिंग किंवा शिलाई -
आपण ब्रँडेड कपड्यांच्या शिलाई कडे लक्ष देऊन ओळख करू शकता. की ते खरे आहे की बनावट. ब्रँडेड कपड्यांची शिलाई सरळ, नीटनेटकी आणि एकसारखी असते. शिलाई मध्ये वापरले  जाणारे धागे-दोरे देखील एकसारखे असते. लावलेल्या बटणांवर  ब्रँडचे नाव लिहिले असते. ह्याचा अर्थ असा नाही की हे सामान्य आहे हे ब्रँडेड बटण आहे.
 
2 झिप -
ब्रँडेड कपड्यांची झिप गुळगुळीत आणि चांगल्या प्रतीची असते, बनावट असलेल्या कपड्यांची झिप मधून अडकते त्याची गुणवत्ता कमी असते. झिप ने ब्रँडेड कपड्यांची ओळख करणे सहज शक्य आहे. ते चटकन उघडा आणि बंद करा. असं केल्यानं आपल्याला लक्षात येईल. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बऱ्याच ब्रँडेड कपड्यांच्या झिपवर ब्रँडचे नाव लिहिलेले असतात.
 
3 बटण-
ब्रँडेड कपडयांच्या बटणांवर ब्रँडचे नाव लिहिलेले असतात. तर कॉपी केलेल्या कपड्यांवर साधारण बटणं लावतात. पुढच्या वेळी खरेदी करताना बटणांवर देखील लक्ष द्या.
 
4 लोगो -
बऱ्याच वेळा कपड्यां वरील ब्रँडचा लोगो बघून गोंधळ होतो. लोगो बघून कपड्यांची ओळख करणे कठीण होते. आपण आपल्या मोबाईल वर त्या ब्रँडचा लोगो बघून त्या उत्पादनाच्या लोगोशी जुळवू शकता. लोगोची फॉन्ट स्टाइलने देखील आपण  हे ओळखू शकता की हे खरं आहे की बनावट.
 
5 टॅग्स- 
सहसा, ब्रँडेड कपडे खरेदी करताना त्यांच्या टॅग्ससह त्यांना ओळखतो,परंतु बाजारपेठेत त्यांच्या बनावट कपड्यांवर हूबेहू तसेच टॅग्स लावून विकले जातात.बरेच ब्रँड असे आहेत जे कपडयांच्या लायनिंग वर टॅग्स लावतात ज्याच्या साहाय्याने त्यांची खरी ओळख होते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

बाल्कनीतच कुंडीत २० दिवसांत ताजा पालक वाढवायचा असेल, तर ही पद्धत जाणून घ्या....

दिवाळीच्या फराळात हेल्दी पर्याय हवेत? भाजलेले मखाणे, खजूर बाइट्स आणि ड्रायफ्रूट स्नॅक्स

फराळ जास्त दिवस कुरकुरीत कसा ठेवावा? डबे, आर्द्रता आणि साठवणुकीच्या टिप्स

दिवाळीसाठी गॅससमोर तासन्‌तास उभे राहायचे नाही? कमी वेळात तयार होणारे ७ चविष्ट पदार्थ

आई-वडील, भाऊ-बहीण आणि मित्रांसाठी दिवाळी गिफ्ट्स; बजेटमध्ये १५ उपयोगी आणि वेगळ्या गिफ्ट आयडिया

पुढील लेख
Show comments