बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

स्टाइलिश लुक देते बॅक ज्वेलरी

दागिने म्हणजे स्त्रियांचा सर्वात मोठी कमजोरी. मग ते दागिने मौल्यवान असो किंवा इमिटेशन, महिलांना नेहमी वैरायटी हवे असते. ज्वेलरीत ‍निरंतर नवीन-नवीन ट्रेंड येत असतात. आणि हे ट्रेंड फॉलो करणे महिलांचा छंद असतो. सध्याची ट्रेंड म्हणजे बॅक ज्वेलरी. आपल्या काही हटके हवं असेल तर आपण बॅक ज्वेलरी घालून मिरवू शकता. ही ज्वेलरी वेस्टर्न तर ट्रॅडिशनल लुकमध्ये ही बॅकलेस किंवा डीपबॅक ड्रेसेसमध्ये कॅरी करू शकता. बघू आपण कश्यारित्या ही ज्वेलरी कॅरी करू शकता:
* बॅक ज्वेलरी घालायची म्हटल्यावर सर्वातआधी ड्रेस बॅकलेस किंवा डीप नेकचा असणे आवश्यक आहे.
 
अशी ज्वेलरी घालायची असेल तर ड्रेसही स्टेंर्ड्सचा असावा. सेटीन किंवा सिल्कच्या सोबर पीसवर बॅक ज्वेलरी उठून दिसेल.
 

* बॅक ज्वेलरी घालायची असेल तर हाय बन घालावे. केस पाठीवर नसले पाहिजे. बन जमत नसल्यास संपूर्ण केस एकाबाजूला वळवू शकता. ज्याने बॅक ओपन राहील.
 
केसांचे बन घातल्यास त्यावर अॅक्सेसरीज वापरत असाल तर ती बॅक ज्वेलरशी मॅच असली पाहिजे. नाहीतर खूप वाईट दिसेल.
 
बॅक ज्वेलरी हेवीच असली पाहिजे असे अजिबात नाही. आपण उत्सवमूर्ती असल्यास हेवी पीस घालायला हरकत नाही. इतर वेळेस साधी चेनदेखील शोभा वाढवेल.