Marathi Biodata Maker

रोजच्या पेहरावाला नवरात्रीचा साज

Updated: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (15:39 IST)
 
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा एकापाठोपाठ येणार्‍या सणांसाठी विविध पोशाखांची आखणी केली जाते. नवरात्रीत येणार्‍या नवरंगासाठी कपड्यांची जुळवाजुळव होते. घागरा, चनिया चोली, भरजरी साड्या, त्यावर खुलणारे दागिने अशा वेशभूषा केलेल्या तरुणींनी दांडिया फुलून गेल्याचे चित्र काही काळापूर्वी दिसत असले तरी यंदा मात्र रोजच्याच पेहरावाला तरुणींनी पसंती दिली आहे. नवरात्रीतील नऊ रंगांचे पोशाख परिधान करणे सोपे असले तरी साध्या पोशाखात ते रंग वापरले जातात. नोकरी, कॉलेज अशा रोजच्या ठिकाणी प्रवास करणार्‍या महिलांना पारंपरिक पोशाख करणे शक्य नसते. त्यामुळे कुर्ती, टॉप, चुडीदार या रोजच्या वापरातील पोशाखांकडेच महिलांचा कल आहे. महिलांची ही गरज लक्षात घेत यंदा बाजारातही अशाच पद्धतीच्या पोशाखांनी गर्दी केली आहे. यामध्ये लाल, पिवळा, निळा अशा गडद रंगांचे कुर्ती, त्यावरील आरशांची नक्षी, हँडप्रिंट केलेले टॉप यांच्यात वैविध्य आहे. पारंपरिक पोशाखांच्या तुलनेत कमी खर्चिक असणारे हे प्रकार कामाच्या ठिकाणी घालणे सहज शक्य आहे, तसेच नवरात्रीनंतरही ते वापरता येत असल्याने महिलांची अशा कपड्यांना मागणी आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments