बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

उन्हाळ्यात लग्न करताना वापरा असे दागिने…

लग्न समारंभ म्हणजे आनंदाता क्षण असतो. मात्र उन्हाळ्यात लग्न आणि तेही दिवसा. ही कल्पनाच करू शकत नाही. अशात आपण सुंदर दिसण्यासाठी काय कराव बर… पण सुंदर ही दिसाव आणि दागिने, कपड्‌यांचा उन्हाळ्यात जास्त त्रास होऊ नये यासाठी काय करावे? हा प्रश्‍न निर्माण होतो. पण तुम्ही का करता चिंता…

आम्ही सांगतोना उन्हाळ्यात दिवसा लग्न असेल तर वापरा हलके दागिने. ज्यामुळे तुम्हाला होणार नाही त्रास. आता हलके दागिने घालायची ट्रेंड आला आहे. तुम्हालाही कमी दागिन्यांमध्ये सुंदर दिसायचे असेल तर तुमच्यासाठी काही टिप्स…
पाम कफ- हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाम कफ वापरता येईल. पाम कफमुळे तुमचा हात अधिकच सुंदर दिसेल. पाम कफ निवडताना हलक्‍या, वजनाचा नाजूक डिझाईनचा निवडा.
पैंजण: पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी पैंजनांचा उपयोग करता येईल.
मोती – मोत्यांची फॅशन कधीच जुनी होत नाही. आपल्या त्वचेच्या रंगाला सूट होईल असा मोत्याचा हार निवडा. 
मोत्याचा हार तुम्हाला एलिगंट स्वरूप देईल.यामुळे लग्नात एन्जॉय करताना त्रास होणार नाही.
सुंदर कानातले – कानातले झुमके जरा जास्त मोठे असतील तर काही बघायलाच नको. कानातले भारदस्त असतील तर गळ्यात काही घालायची गरज नाही.