1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:12 IST)

फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Remember these things before traveling in a flight Avoid these things during travelling flight  MArathi Fashion Tips In Marathi Webdunia Marathi
प्रवास आरामदायी असणं  महत्त्वाचे आहे.लोक आरामासाठी बरेच काही करतात.अशा परिस्थितीत जर आपण फ्लाईट ने प्रवास करत असाल तर काही गोष्टींना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.प्रवासादरम्यान स्टायलिश दिसण्यासह काही गोष्टीना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.काही अशा चुकांबद्दल जाणून घ्या,ज्या आपण नकळत करता.
 
1 अन्कम्फर्ट शूज-हे अतिशय सामान्य आहे,पण असेही काही लोक आहे जे हे विसरतात.आरामदायी शूज आपल्या प्रवासाला सहज बनवते.या व्यतिरिक्त आपण उंच टाचा असलेले सॅंडल आणि चपला आपल्या बॅगेत ठेवा.प्रवासात शूज वापरा. यामुळे आपल्याला चालायला आणि सामान उचलायला सोपं होईल.या शिवाय आपण पट्ट्याचे शूज वापरू नका
 
2 घट्ट कपडे घालू नका -घट्ट कपडे घालून प्रवासात एकाच स्थितीत बसल्यामुळे अस्वस्थता जाणवू शकते म्हणून प्रवासात सैलसर आणि आरामदायक कपडे घाला.
 
3 चुकीचं फेब्रिक निवडू नका-नायलॉन, पॉलिस्टर किंवा उष्णतेमध्ये घाम काढणाऱ्या  कपड्यांपासून दूर राहा. असे कपडे हवेचे संचलन रोखतात. या हंगामात जर आपण असे कपडे घातले तर आपल्याला घाम जास्त येईल आणि फॅशनेबल किंवा आरामदायक वाटणार नाही आणि घामाचा वास इतर प्रवाशांनाही त्रास देईल.
 
4 कॉम्पलीकेटिड कपडे- फ्लाईटचे वॉशरूम लहान असतात,जर प्रवासात आपण जंपसूट किंवा अवघड कपडे घालता तर हे आपल्यासाठी त्रासदायक होऊ शकत.लॉन्ग ड्रेस किंवा पेंट देखील घालणे टाळा.कारण हे फरशीवर लागून खराब होऊ शकतात. म्हणून प्रवासाच्या दरम्यान नेहमी साधें कपडे घाला.
 
5 परफ्युम -प्रवास करताना इतर प्रवाशांची काळजी घेता परफ्युम लावणे टाळा.कारण काही लोकांना हे त्रासदायक होऊ शकतो.एखाद्याला परफ्युमची एलर्जी असू शकते.या मुळे त्याला त्रास होऊ शकतो.अशा परिस्थितीत आपण गंतव्य स्थानकावर पोहोचल्यावरच परफ्युमचा वापर करा.