गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

सेल्‍फी घेण्यासाठी असा करा मेकअप

अलीकडे सर्वांनाच विशेषतः युवा पिढीच्या डोक्यावर सेल्फीचे भूत चढलेले आहे. परंतु प्रत्येक सेल्फीचा परिणाम सुंदरच येईल असे होत नाही. सेल्फी तेव्हाच छान येते जेव्हा आपला मेकअप योग्य असेल. अनेकदा मुली शेकडो सेल्फी काढून सुद्धा संतुष्ट दिसत नाही आणि ती सेल्फी आपला डीपी म्हणून वापरत नाही. जर आपल्यालाही अशीच तक्रार असेल तर आपण नक्कीच कुठेतरी चुकत आहात. आम्ही येथे देत आहोत सेल्फी मेकअपचे काही टिप्स...
जर आपण कॉलेजमध्ये सेल्फी घेत असाल तर आपला मेकअप न्यूड असला पाहिजे. आपल्या स्किन कलरशी जुळत मेकअप करा आणि मग सेल्फी घ्या. 

जर आपण नॅचरल लाइटमध्ये सेल्फी घेत असाल तर हलका मेकअप करा. डोळ्यावर काजळ आणि मस्कारा लावा. चेहर्‍यावर फाउंडेशनची हलकी लेअर आणि नंतर हलका ब्लशर अप्लाय करू शकता.
 
नॅचरल लुक देण्यासाठी बीबी क्रीम वापरा. याने चेहरा स्मूथ आणि रंग उजळ दिसेल. आपण टिंटिड मॉइस्‍चराइजरही वापरू शकता.

सेल्फी घेण्यासाठी आयब्रो डार्क असावी. यासाठी डार्क आयब्रो पेंसिल वापरा. कारण अधिकश्या कॅमर्‍याच्या फ्लॅशने आयब्रो हलक्या दिसता. अशात आयब्रो डार्क आणि सेट असेल तर सेल्फी छान येईल.
सेल्फीसाठी लिप्‍स मेकअपकडे विशेष लक्ष द्यायला हवं. लाइट मेकअपवर हलका बोल्ड लिप कलर लावा आणि ब्राइट मेकअपवर त्या टोनला सूट करत असलेला लाइट शेड अप्लाय करा.