चेहरा सतेज राहण्यासाठी काही घरघुती उपाय

beauty tips
Last Modified मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (14:03 IST)
1. ऑलिव्ह ऑईल

एक चमचा ऑलिव्ह तेल
स्वच्छ लहान टॉवेल
कोमट पाणी
वापरण्याची पद्धत
आपल्या तळहातावर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकून संपूर्ण चेहऱ्यावर हळुवारपणे लावा. टॉवेल ला कोमट पाण्यात भिजवून त्याने आपला चेहरा पुसून घ्या .दर रोज रात्री हे केल्याने चेहरा सतेज होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.

हे कसे कार्य
करते?
ऑलिव्ह ऑइल आपल्या त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्यामध्ये उपस्थित फ्लावोनॉइड्स आणि पॉलिफेनोल्स सारख्या घटक त्वचेच्या नष्ट होणाऱ्या पेशींना नवजीवन देतात. त्यामुळे चेहऱ्याला सतेजता मिळते.

2. कोरफड
साहित्य
एक चमचे कोरफड जेल
चिमूटभर हळद
एक चमचा मध
एक चमचा दूध

वापरण्याची पद्धत
कोरफड जेल, हळद, मध आणि दूध एकत्र करून पेस्ट तयार करा.
ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांसाठी ठेवा.
यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
हा पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने चांगला परिणाम दिसून येतो.
हे कसे कार्य करते ?
कोरफड जेल त्वचे साठी प्रभावी असते. त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर म्हणून काम करते.त्वचेची नैसर्गिक चमक कायम राखते.

3 ग्रीन टी

साहित्य
एक चमचा ग्रीन टी किंवा ग्रीन टीची पिशवी
एक कप पाणी
दोन चमचे तपकिरी साखर (ब्राउन शुगर )
एक चमचा दूध क्रीम किंवा मलई

वापरण्याची पद्धत
ग्रीन टी पाण्यात उकळवून त्याला गाळून घ्या नंतर थंड होऊ द्या.थंड झाल्यावर त्यात ब्राउन शुगर आणि मलई घाला. ह्या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटाने आपला चेहरा धुवून घ्या. हे आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहरा सतेज होतो.

4 अंडी
साहित्य
एक कच्च अंड्याचा पांढरा भाग
अर्धा बटाट्याचा रस

वापरण्याची पद्धत
कच्च्या अंड्याच्या
द्रव्यात बटाट्याचा रस मिसळा.
हे मिश्रण चेहर्‍यावर लावा.
मिश्रण कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या .

हे कसे कार्य
करते?
अंडीमध्ये प्रथिने आणि इतर बरेच पोषक घटक आढळतात. हे पौष्टिक घटक
आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

5
ग्लिसरीन
साहित्य
अर्धा किंवा एक चमचा
ग्लिसरीन
एक चिमूटभर हळद
एक चमचा मध

वापरण्याची पद्धत
ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट
पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या
आठवड्यातून एकदा ही कृती वापरा.

हे कसे कार्य
करते?
ग्लिसरीन आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्याची चमक वाढवते.

6 पपई
साहित्य
पिकलेली पपईचे काही तुकडे
एक किंवा दोन चमचे लिंबाचा रस

वापरण्याची पद्धत
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.
दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्यावा
आपल्याला आठवड्यातून एक किंवा दोनवेळा
ही पेस्ट वापरावी.

हे कसे कार्य करते?
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पपेन असते. हे दोन्ही जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. तर पपेन आपल्या त्वचेतील छिद्र साफ करते आणि त्वचा उजळते .

7 गव्हाचे पीठ
साहित्य:-
गव्हाचे पीठ एक चमचा
दोन चमचे तिळाचे तेल
एक चमचा हळद

वापरण्याची पद्धत
एका भांड्यात गव्हाचे पीठ, तिळाचे तेल आणि हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
आपल्याला आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावण्याने चेहऱ्यावर कांती येते.

हे कसे कार्य
करते?
गव्हाचे पीठ चेहर्‍यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते.

8
दही
साहित्य
अर्धा कप दही
एक किंवा दोन चमचे लिंबू किंवा संत्र्याच्या
रस

वापरण्याची पद्धत
एका भांड्यात दही घ्या आणि त्यात लिंबाचा किंवा संत्र्याच्या रस मिसळा.
हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
नंतर थंड पाण्याने देखील ही आपला चेहरा धुण्यास विसरू नका.

हे कसे कार्य
करते?
दह्यांमधे काही प्रोबायोटिक घटक असतात, जे आपल्या त्वचेची सूर्याच्या हानिकारक विकिरणांपासून संरक्षण करतात. हे घटक त्वचेचे डाग व्रण
कमी करतात आणि सतेज बनवतात.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स
गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...

ब्रोकोली गुणांचा खजिना....

ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...