Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beauty Tips चेहरा सतेज राहण्यासाठी काही घरघुती उपाय

Published: बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (19:24 IST)
 
3 ग्रीन टी  
साहित्य
एक चमचा ग्रीन टी किंवा ग्रीन टीची पिशवी
एक कप पाणी
दोन चमचे तपकिरी साखर (ब्राउन शुगर )
एक चमचा दूध क्रीम किंवा मलई
 
वापरण्याची पद्धत
ग्रीन टी पाण्यात उकळवून त्याला गाळून घ्या नंतर थंड होऊ द्या.थंड झाल्यावर त्यात ब्राउन शुगर आणि मलई घाला. ह्या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटाने आपला चेहरा धुवून घ्या. हे आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहरा सतेज होतो. 
 
4 अंडी 
साहित्य
एक कच्च अंड्याचा पांढरा भाग  
अर्धा बटाट्याचा रस
 
वापरण्याची पद्धत
कच्च्या अंड्याच्या  द्रव्यात बटाट्याचा रस मिसळा.
हे मिश्रण चेहर्‍यावर लावा.
मिश्रण कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या .
 
हे कसे कार्य  करते?
अंडीमध्ये प्रथिने आणि इतर बरेच पोषक घटक आढळतात. हे पौष्टिक घटक  आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. 
 
ग्लिसरीन
साहित्य
अर्धा किंवा एक चमचा  ग्लिसरीन
एक चिमूटभर हळद
एक चमचा मध
 
वापरण्याची पद्धत
ग्लिसरीन आणि हळद मधात मिसळून घट्ट  पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या 
आठवड्यातून एकदा ही कृती वापरा.
 
हे कसे कार्य  करते?
ग्लिसरीन आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्याची चमक वाढवते.
 
6 पपई
साहित्य
पिकलेली पपईचे काही तुकडे
एक किंवा दोन चमचे लिंबाचा रस
 
वापरण्याची पद्धत
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.
दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्यावा 
आपल्याला आठवड्यातून एक किंवा दोनवेळा  ही पेस्ट वापरावी.
 
हे कसे कार्य करते?
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पपेन असते. हे दोन्ही जीवनसत्त्वे अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात. तर पपेन आपल्या त्वचेतील छिद्र साफ करते आणि त्वचा उजळते .
 
7 गव्हाचे पीठ
साहित्य:-
गव्हाचे पीठ एक चमचा
दोन चमचे तिळाचे तेल
एक चमचा हळद
 
वापरण्याची पद्धत
एका भांड्यात गव्हाचे पीठ, तिळाचे तेल आणि हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
आपल्याला आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावण्याने चेहऱ्यावर कांती येते.
 
हे कसे कार्य  करते?
गव्हाचे पीठ चेहर्‍यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते.
 
दही
साहित्य
अर्धा कप दही
एक किंवा दोन चमचे लिंबू किंवा संत्र्याच्या  रस
 
वापरण्याची पद्धत
एका भांड्यात दही घ्या आणि त्यात लिंबाचा किंवा संत्र्याच्या रस मिसळा.
हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
नंतर थंड पाण्याने देखील ही आपला चेहरा धुण्यास विसरू नका.
 
हे कसे कार्य  करते?
दह्यांमधे काही प्रोबायोटिक घटक असतात, जे आपल्या त्वचेची सूर्याच्या हानिकारक विकिरणांपासून संरक्षण करतात. हे घटक त्वचेचे डाग व्रण  कमी करतात आणि सतेज बनवतात.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आकाश मुद्रा योग केल्याचे १४ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : गोष्ट खार, वेळ आणि अक्रोडची

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

मुलांसाठी 'ह' अक्षरावरून ५० सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी नावे

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

पुढील लेख
Show comments