suvichar
✕

जगण्याची उमेद जागवणारी 'लालबागची राणी'

Updated: बुधवार, 8 जून 2016 (14:46 IST)
 
'लालबागची राणी' या चित्रपटातील एका घटनेंत संध्या नंदिनी नावाच्या तरुणीला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त करते. चित्रपटातील हि घटना जीवनाला कंटाळून मृत्यूला कवेत घेणाऱ्या अनेक संवेदनशील माणसांना बरेच काही शिकवून जाते. याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे,आयुष्यातील अपयशांमुळे आत्महत्त्या करण्याच्या विचारात असलेल्या एका तरुणीने  हा सिनेमा पाहिल्यानंतर आपले मत बदलले. लक्ष्मण उतेकर ह्यांच्या फेसबुकवर या मुलीने 'लालबागची राणी' हा सिनेमा बघितल्या नंतर आपल्यात झालेल्या या बदलाचा मेसेज करताना सांगितलं की, आयुष्यात एकामागोमाग एक घडत असलेल्या कडू घटनांमुळे, अपयशांमुळे तसेच प्रेमभगांमुळे तिच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार येत होते. ती मुलगी आय. टी. सेक्टरमध्ये काम करणारी असून मुंबईत एकटी स्थित असल्याने तिच्या मनात असे विचार येणे स्वाभाविकच होते. अशा विचारात उदासीन अवस्थेत एका मॉलमध्ये फिरत असताना वेळ जावा म्हणून त्या मुलीने 'लालबागची राणी' पहिला. 'हा सिनेमा पाहताना माझे अश्रू अनावर झाले, सिनेमा सुरु असताना कोणीतरी खूप दिवसांनी माझ्या दुखण्यावर मायेने फुंकर घातली असल्याचा भास  मला झाला, असे तिने सांगितले. ' 'लालबागची राणी' हा चित्रपट आयुष्य सेलिब्रेट करायला शिकवणारा सिनेमा आहे, आणि या सिनेमामुळे जर एखाद्या नाउमेद व्यक्तीची आयुष्य जगण्याची उमेद पुन्हा जागी झाली असेल तर, ती 'लालबागची राणी' या चित्रपटाचे आणि आमच्या संपूर्ण टीमचे मोठे यश आहे, असे उतेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 
 
कसदार अभिनेत्री वीणा जामकरची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा एका असाधारण मुलीच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमातील संध्या म्हणजेच लालबागची राणी तिच्या निखळ, पारदर्शीपणाने भेटणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात घर करते. 'विनाच्या उत्कृष्ट अभिनयाची सर या चित्रपटात पाहायला मिळत असून, जगाला वेडी वाटणारी हि संध्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना विद्वान वाटते. 
 
सुनील मनचंदा यांनी मॅड एटरटेन्मेंट बनर खाली या सिनेमाची निर्मिती केली असून बोनी कपूर हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. यात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयोग जोशी,जगन्नाथ निवगुने हे कलाकार देखील आहेत.

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

पुढील लेख
Show comments