1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
  4. 'पोश्टर बॉइज’ : चित्रपट परीक्षण

'पोश्टर बॉइज’ : चित्रपट परीक्षण

पोस्टरवर झळकणं हे किती शानचं असतं. हे जाहिरात क्षेत्राने सिद्ध केलं आहे. पण पोश्टरवर झळकण्याम ध्ये जी काय नामुष्की ओढवली जाते. जेव्हा ते पोश्टर हे बिनटाका नसबंदी शस्त्रक्रियेचं असतं. अन् ऑपरेशन न करता अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं अन् हे सारं गाफिलपणे घडतं. फोटो ही जत्रेमध्ये आनंदाच्या मूडमध्ये असताना काढलेले या जाहिरातीसाठी वापरले जातात. त्यामुळे या सार्‍या  अडचणींमध्ये अडकलेले तिघे जण ज्यावेळी एकत्र भेटतात. अन् आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून त्यासाठी दाद मागायला जातात. त्यावेळी त्या पोश्टर बॉइजचं नेमकं काय होतं, याची रंजक कहाणी आपल्याला पोश्टर बॉइजमध्ये अनुभवायला मिळते. 
 
पहिल्या सिनेमाङ्कध्ये दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशीसारखे कसलेले कलावंतसोबत असणं, अन् त्यांनी त्यांचं नाणं चोखपणे वाजवणं, ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. जगन आबा पाटील म्हणजे दिलीप प्रभावळकर, गावातल्या शाळेत मास्तर सदानंद कुलकर्णी म्हणजे ऋषिकेश जोशी अन् अर्जन जगताप म्हणजे अनिकेत विश्वासराव हे तिघं तीन वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं. तिन्ही वेगवेगळ्या वयोगटातील. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा. तिन्ही आपापल्या परीने वल्ली असणार्‍या आसामी आहेत. त्यांच्या जगण्याला लय भारी म्हणावे, अन् त्यांना कशामुळे किक मिळावी, असे फॅक्टर्सही भन्नाट आहेत. जगन आबांची वट आहे गावात. शिक्षक म्हणून मुलांना त्सुनामी शिकवणार्‍या कुलकर्णीच्या आयुष्यात त्यांची पत्नी असणारी सुलेखा म्हणजे नेहा जोशी. तिच्या भांडणाचा अन् जाधव बाईंच्या सॉफ्ट कॉर्नरमध्ये घुसमटलेले कुलकर्णी सर अन् व्यायामशाळेत रग काढणारा अन् गुड डेज ऑफ इंग्लिश आर वेण्ट असं वाटावं. इतक्या सफाईने इंग्रजी बोलणारा अर्जुन म्हणजे अनिकेत विश्वासराव. त्याच्या आयुष्यात असणारी पल्लो डार्लिग म्हणजे पूजा सावंत. या सगळयांच्या आयुष्यात एकदम वादळ येतं, ज्यावेळी हे तिघे एकत्र बिनटाका नसबंदी शस्त्रक्रियेच्या जाहिरातीत दिसतात, त्यानंतर तिघांकडे अवघ्या गावाचा पंचक्रोशीचा बघण्याचा अंदाजच बदलून जातो, त्या सगळ गोष्टींवर वेगळ प्रकारे एक्स-रे टाकला आहे. एकूणच शासकीय पातळीवरची या अभियानातील उदासीनता अन् त्याबद्दलची सजगता या सगळ्यावर वेगळ्या प्रकारचा एक्स-रे या सिनेमाङ्कध्ये टाकली गेली आहे.