मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 25 एप्रिल 2016 (13:21 IST)

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘भो भो’..!

प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेला ‘भो भो’सिनेमा प्रदर्शित झाला. एका मोठय़ा अंतरानंतर या सिनेमामधून प्रशांत दामले व्यंकटेश भोंडे ही केंद्रवर्ती व्यक्तिरेखा साकारतायत. भरत गायकवाड लिखित दिग्दर्शित या सिनेमाची कथा आणि मांडणी एका खुनाभोवती फिरते. सिनेमाची सुरुवात होते तिच मुळात स्मिता भांडारकर या महिलेच्या खुनापासून. ज्याचा आळ त्याच घरातल्या सॅन्डी या पाळीव कुत्र्यावर आलेला असतो.
 
स्मिताच्या नावावर एक कोटी रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी असते. जी तिच्या आईला दिली जावी ही मागणी समोर येते आणि इथेच होते ती व्यंकटेश भोंडे म्हणजेच प्रशांत दामलेची एन्ट्री. 
 
एन्शुरन्स पॉलिसी आधी योग्य तपास व्हावा यासाठी भोंडेंची नियुक्ती होते. एक डॉग लव्हर असणारा भोंडे सॅन्डीला भेटतो आणि मग त्या खुनाचा खरा गुन्हेगार शोधायला लागतो. ‘भो भो’सिनेमा हा याच टप्प्यांमधून उलगडत जातो.
 
सिनेमातला खुनाचा तपास हा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे पण यादरम्यान घडणार्‍या सर्वच गोष्टी तर्कास अनुसरुन आहेत असे नाही. सिनेमादरम्यान घडणार्‍या काही गोष्टी पूर्ण सिनेमा संपला तरी न उलगडता तशाच राहिलेल्या जाणवतात ही बाब खटकते. अर्थात प्रशांत दामले आणि त्यांचे विनोदाचे टायमिंग माहीत असलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा नक्कीच एक ट्रीट असेल.