बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी पल्लवी जोशी एक अष्टपैलू कलाकार
मराठी प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि ९० च्या दशकात टेलिव्हिजनवर आपले वर्चस्व गाजवले.
तसेच पल्लवी जोशी या हिंदी चित्रपट आणि मराठीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे, ज्यांनी खूप लहान वयात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ४ एप्रिल रोजी मुंबईत जन्मलेल्या पल्लवी यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तसेच १९७९ साली प्रदर्शित झालेल्या 'दादा' या चित्रपटात 'मुन्नी'ची भूमिका साकारून त्यांनी बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर त्या 'आदमी सडक का', 'नाग मेरे साथी' आणि 'परख' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. पल्लवी जोशी यांनी चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या असल्या तरी, त्यांची खरी लोकप्रियता टेलिव्हिजनमुळे मिळाली. त्यांना त्यांच्या दमदार अभिनयामुळे 'टेलिव्हिजनची राणी' हे टोपणनाव मिळाले.
पल्लवी जोशीने सुमारे १९९४ पासून चित्रपटांमध्ये सक्रियपणे काम करत आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिच्या अभिनयकौशल्यामुळे ती एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखली गेली.आज पल्लवी जोशी केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर एक यशस्वी चित्रपट निर्मातीसुद्धा आहे.
Edited By- Dhanashri Naik