ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री मोहोर
भारतीय चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः मराठी चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मश्री पुरस्कार हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी अशोक सराफ यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते असून जे त्यांच्या विनोद आणि अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार, किंवा मामा म्हणून ओळखले जाते. तसेच अशोक सराफ यांचे नाव मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि नाटक जगात मोठ्या आदराने आणि लोकप्रियतेने घेतले जाते. त्यांनी १९६९ च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी बहुतेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि लवकरच त्यांच्या कॉमिक टायमिंग, उत्स्फूर्त अभिनय आणि हृदयस्पर्शी पात्रांमुळे ते प्रेक्षकांचे आवडते बनले. त्यांनी २५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशोक मामांनी छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर देखील अभिनय केला आहे. अनेक मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.
अशोक सराफ यांनी ९० च्या दशकात टीव्हीवरही आपला ठसा उमटवला. अशोक सराफ यांना यापूर्वी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहे, ज्यात अकरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मराठी यांचा समावेश आहे.
Edited By- Dhanashri Naik