अविनाशी मास्टरपीस....
किरण जोशी
|
संगीत रंगभूमीची मनोभावे पूजा करणारा नाट्यपंढरीचा वारकरी मास्टर अविनाश तथा गणपतराव मोहिते यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. शंभरीतही चिरतारूण्य अनुभवत असल्याची भावना व्यक्त करणा-या मास्टर अविनाश यांच्या चेह-यावर कायम समाधानाची लकेर असायची. 'जीवनात कधीही खचून जाऊ नका, संगीतच तुम्हाला जगण्याचे बळ देते, अखेरच्या श्वासापर्यंत संगीत सोडणार नाही' असे सांगणा-या मा.अविनाश यांनी आपला शब्द खरा केला. शंभरीचे वयोमानातही त्यांच्या चीजा ऐकताना प्रत्येकजण जुन्या काळात हरवून जात असे. मा. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला त्यामुळेच मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. मंगेशकर कुटूंबियांचा 'गणूतात्या' या नावाने त्यांची नाट्यपंढरी सांगलीत ओळख होती. एकेकाळी आपल्या पहाडी आवाजाने आणि समर्थ अभिनयाने संगीतरंगभूमी गाजवणा-या मा. अविनाश यांचे लोकमान्य टिळकांपासून अनेक दिग्गजांनी कौतुक केले होते पण, आयुष्याच्या उतरत्या काळात इतर रंगकर्मींप्रमाणेच त्यांचीही उपेक्षा झाली, याची खंत कायम सलत राहिल.
मा. अविनाश यांचा जन्म 1 जानेवारी १९०९ रोजी सांगली लगतच असणा-या मिरज येथे झाला. संगीत शाकुंतल या नाटकात वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी केलीली ऋषिकुमारची भूमिका इतकी गाजली की भारावलेल्या लोकमान्य टिळकांनी त्यांना सोन्याची अंगढी देऊन गौरव केला. त्यांचा नावलौकिक वाढला तो स्त्री पात्र भूमिकांमुळे. मानापमानमधील भामिनी, ब्रह्मकुमारीमधील अहिल्या, विद्याहरणमधील देवयानी, रामराज्यवियोगमधील सीता, भावबंधनमधील मालती अशा नानाविविध भूमिका करून त्यांनी रसिकांचे मन जिंकले. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून जायचे आणि
बळवंत नाटकमंडळीबरोबरच त्यांनी ललित कलादर्श, शाहूनगरवासी व किर्लोस्कर आदी नाट्य संस्थांमधूनही काम केले. त्यांनी अनेक भूमिका केल्या. 'धुव्र’, 'भक्त प्रल्हाद’ अशा पौराणिक नाटकांतूनही त्यांनी काम केले. गोविंद बल्लाळ देवल यांचे 'संगीत शारदा' , 'शाप संभ्रम' 'ब्रम्हकुमारी', 'संन्यस्त खड्ग','उग्र मंगल', ‘सौभद्र', 'विद्याहरण', 'एकच प्याला’ या नाटकांमधून त्यांनी आपल्या स्त्री पात्र भूमिकांची छाप सोडली.
|
