बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

सलामत रहे दोस्ताना हमारा...

बाजारात घाईघाईने चाललेली नेहा अचानक कुणाला तरी बघून थांबली. तिला आपला लहानपणीचा मित्र अखिल दिसला.

NDND
धावत जाऊन तिने अखिलला हाक दिली. अखिलने मागे वळून बघितले तर नेहा! दम लागलेली नेहा म्हणाली, 'अखिल मी... मी... नेहा' 'नेहा अरे तू...इतक्या वर्षानंतर... मी तर तुला ओळखलं नाही. भागांत कुंकु, कपाळावर टिकली, साडी नेसलेली नेहा, अखिलच्या लहानपणची नेहा या नेहापेक्षा खूपच वेगळी दिसत होती. अखिल आणि नेहा दुसरीच्या वर्गात एकत्र होते.

एकच शाळा, एकच वर्ग आणि एकाच कॉलनीत रहात होते. जेवण, अभ्यास, भांडणे, मौजमजा, प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगणे, सल्ला मसलत करणे यामुळे त्यांच्यात प्रगाढ मैत्रीला झाली होती. बारावीनंतर अखिल पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आणि पाच वर्षानंतर जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा नेहाचे लग्न झाले होते. एकेकाळी एकमेकांची ओळख असणारे अखिल आणि नेहाला आज काय बोलावे हे सुचत नव्हते.

अशा अनेक मित्रांना विविध कारणाने एकमेकांपासून दूर जावे लागते. मुलगा आणि मु‍लगी यांच्या मैत्रीत असे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. लग्न, करिअरमुळे अनेक चांगले मित्र एकमेकांपासून दूर जातात. आपण ठरवले तर चांगली मैत्री टिकवून ठेवू शकतो.

कायम संपर्कात रह
दूरध्वनी, ई-मेल, संदेशाद्वारे कायम एकमेकांच्या संपर्कात रहा. आज कितीतरी आधुनिक संपर्क साधने उपलब्ध आहेत. जग अगदी जवळ आले आहे. मग आपण आपल्या मित्राच्या संपर्कात का राहू शकत नाही? आठवड्यातून एकदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ई-मेल किंवा दूरध्वनी करून विचारपूस करा.

NDND
विशेष कार्यक्रम असल्यावर भेटू शकत
त्याग मै‍त्रीची पहिली अट आहे
प्रेम हीच साधना दूसरी अट आहे
एकटेपणा जीवनासाठी शाप आहे
ज्या सुखात आपण इतरांना सहभागी
करून घेत नाही तो आनंद पण व्यर्थ आहे

मनुष्य कितीही व्यस्त असला तरीही वाढदिवस, किंवा सण साजरे करण्यासाठी वेळ काढावा. अशी संधी केवळ मित्र आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असते.

मैत्रीवर विश्वास ठेव
आपली मैत्री खरी असेल तर सर्वजण तिच्याकडे आदराने बघतील. आपला पति किंवा पत्नीच्या मैत्रीवर संशयाने पाहू नये, मित्राच्या कुटूंबात प्रेमाने आणि आनंदाने सहभागी व्हा.

NDND
मित्र प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडत
मैत्रीत कर्तव्य किंवा बंधन नसते, मैत्रीत अधिकार असतो. जर आपले कुटूंब अडचणीत असेल तर आपल्या मित्राला मदत मागण्यास मागेपुढे पाहू नये.

मैत्री एक पवित्र नाते असून त्यामध्ये कोणतेही बंधन किंवा जबरदस्ती नसते. मैत्री निस्वार्थी असते. खरी मैत्री आयुष्यभर टिकते आणि जबाबदार मित्र प्रत्येक सुख दुखात सहभागी होतो. तर मित्रांनो, आज मैत्री दिनानिमित्त असा संकल्प करा की आपल्या खर्‍या मैत्रीला जगाच्या गर्दीत विसरून जाणार नाहीत. जर आपल्याला आपल्या मैत्रीवर विश्वास असेल तर ती जीवनभर आपल्याबरोबर येईल.