शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (11:38 IST)

लग्नात विलंब होत असेल तर हे उपाय खास आपल्यसाठी

लग्न ठरत नसेल तर हे 7 उपाय करून पहा
मुलाच्या लग्नात विलंब किंवा अडथळे येत असतील तर शुक्राचे उपाय करावेत-
 
1. मंगळवारी हनुमानजींच्या मूर्तीच्या कपाळावर थोडेसे सिंदूर घेऊन राम-सीतेच्या चरणी अर्पण करा आणि लवकर लग्नाची कामना करा.
 
2. सोमवारी 1 किलो 200 ग्रॅम चण्याची डाळ दीड लिटर दूध एखाद्या गरजूला दान करा.
 
३. लाल गाईला पोळीत गुळ ठेवून खाऊ घाला. केशरी भात, चण्याची पिवळी डाळ किंवा कणकाच्या पेड्यावर जराशी हळद लावून खाऊ घाला.
 
४. प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका.
 
5. सोमवारी व्रत ठेवा आणि आकड्याच्या 8 पानांची पूजा करुन 7 पानांचे ताट बनवा आणि 8 व्या पानावर आपले नाव लिहून महादेवाला अर्पित करा.
 
६. पुरुषांनी पांढऱ्या कागदावर वेगवेगळ्या रंगानी स्त्रियांची चित्रे तीन महिन्यांपर्यंत दररोज एक- एक करून काढावीत.
 
7. शुक्रवारी व्रत ठेवा आणि लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.
 
टीप- तुम्ही योग्य ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवल्यानंतरच वरील उपाय करू शकता.