मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:26 IST)

गुरुवारी हे 5 उपाय केल्याने गुरु होईल बळकट

guru grah
जर आपल्या कुंडलीत गुरु अर्थात बृहस्पती कमजोर स्थितीत असेल तर आपल्याला याला शुभ करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जाणून घ्या बृहस्पतीला प्रसन्न कसे करावे -
 
1 गुरुवारी उपास करावा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने बृहस्पती प्रसन्न होतात. गुरुवारी व्रतकथा करणे आणि पिवळं अन्न किंवा पक्वान्न सेवन करणे शुभ फल देतं. 
 
2 या दिवशी केळीच्या झाडाला पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पित कराव्यात.
 
3 गुरुवारी बृहस्पती संबंधी वस्तू दान केल्याने वेदना आणि दोषांपासून मुक्ती मिळते. 
 
4 पिवळे फुलं, पिवळे वस्त्र, साखर, घोडा (लाकडी किंवा खेळणी घोडा), चण्याची डाळ, हळद, ताजी फळं, मीठ, स्वर्णपत्र, पितळ इत्यादीचे दान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव नाहीसा होतो.
 
5 पांढरी मोहरी, पांढरे फुलं, जाईचे फूल, गूलर, दमयंती, मुलेठी आणि मध मिश्रित पाण्याने स्नान केल्याने बृहस्पतीचा अशुभ प्रभाव कमी होऊन वेदनांपासून मुक्ती मिळते.