गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

बुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ

ashata ganesh mahodar
बुधवार गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वांत शुभ दिवस असतो. या मंगळ दिवशी गणेश मंत्र उच्चारित करून गणेश पूजन केल्यास बुद्धी, ज्ञान व शक्तीत वाढ होते.

पहाटे अंघोळ करून गणपती मंदिरात आकडे किंवा शेंदूर लेपीत गणपतीच्या मूर्तीला स्नान करवावे. तूप आणि शेंदूर लावावे. चंदन, पिवळे सुगंधित फुलं, 5 किंवा 21 दूर्वांची जोडी, जानवं, नारळ, गूळ-धणे आणि सुपारी अर्पण करून आपल्या सार्मथ्यप्रमाणे लाडवांचा नैवेघ दाखवावा.

पूजा झाल्यावर धूप आणि दिवा लावून या गणेश मंत्राचा जाप करावा: त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय। नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।

यानंतर आरती ओवाळून व कपाळावर शेंदूर लावून प्रसाद ग्रहण करावा.