शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पत्रिकेत सरकारी नोकरीचे योग

व्यक्तीच्या जीवनात लहान मोठ्या घटनेसाठी पत्रिकेतील ग्रहांचा सहयोग असतो. कुंडलीमध्ये ज्या प्रकारे ग्रह शक्तिशाली असतात त्याच प्रकारे त्याचे परिणाम देखील व्यक्तीला मिळतात. बर्‍याच वेळा असे ही होत की बरीच मेहनत करून देखील व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. तुमच्या माहितीसाठी  की सरकारी नोकरीचे निर्धारण व्यक्तीची योग्यता, शिक्षा, अनुभवासोबत त्याच्या जन्मपत्रिकेत बसलेल्या ग्रहांच्या योगामुळे देखील होतो. तर जाणून घेऊ ते कोणते ग्रह योग आहे जे सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करतात. 
 
सरकारी नोकरीसाठी पत्रिकेत खाली दिलेले योग शुभ मानले जातात -
 
पत्रिकेत दहाव्या स्थानाला कार्यक्षेत्रासाठी योग्य मानले जाते. सरकारी नोकरीचे योग बघायचे असतील तर या स्थानाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. दहाव्या स्थानात जर सूर्य, मंगळ किंवा गुरुची दृष्टी पडत असेल तर सरकारी नोकरीचे योग प्रबळ असतात. कधी कधी असे ही बघण्यात येते की जातकाच्या पत्रिकेत दहाव्या घरात तर हे ग्रह असतात पण तरी देखील जातकाला संघर्ष करावे लागतो आणि अशा परिस्थितीत जर सूर्य, मंगळ किंवा गुरुवर एखाद्या   पाप ग्रहा (अशुभ ग्रह)ची दृष्टी पडत असेल तेव्हा देखील जातकाला सरकारी नोकरीत समस्या येते.  
 
केंद्रात जर चंद्र, गुरू एकत्र असतील तर त्या स्थितीत देखील सरकारी नोकरीचे चांगले योग बनतात. तसेच चंद्र आणि मंगळ देखील जर केंद्रस्थ असतील तर सरकारी नोकरीची शक्यता वाढून जाते.  
 
पत्रिकेत दहावे घर बलवान असल्याने तथा या घरात एक किंवा जास्त शुभ ग्रहांचा प्रभाव असल्याने जातकाला आपल्या करियरच्या क्षेत्रात फार यश मिळत व या घरात एक किंवा जास्त वाईट ग्रहांचा प्रभाव असल्याने जातकाला योग्य ते यश मिळत नाही.