1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शनिवार, 15 जून 2024 (12:06 IST)

15 जून रोजी महेश नवमी, या 5 राशींच्या लोकांचे भाग्य उजळेल

Mahesh Navami 2024 वैदिक पंचांगानुसार प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला महेश नवमी साजरी केली जाते. यंदा 15 जून रोजी महेश नवमी असून या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांची पूजा- आराधना केली जाते. यंदा महेश नवमी पूजा शुभ मुहूर्त प्रात: 07 वाजून 15 मिनिटापर्यंत आहे. या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने देवाची पूजा केली तर त्याच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. तसेच व्यक्तीला त्याच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. आता जाणून घेऊया 12 राशींपैकी कोणत्या राशींसाठी महेश नवमीचा सण भाग्यवान ठरू शकतो.
 
या 5 राशींच्या जातकांना होणार फायदा
मेष- महेश नवमीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरी करत असलेल्या लोकांचे प्रमोशन होऊ शकतो. अविवाहित मुलींचे विवाह निश्चित होऊ शकतात. व्यवसाय करणार्‍यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.
 
कर्क- बेरोजगारांना परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढू शकते. आता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. व्यावसायिकांचा बँक बॅलन्स वाढू शकतो.
 
तूळ- कामाच्या दृष्टिकोनातून तूळ राशीच्या लोकांसाठी महेश नवमीचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
 
सिंह- कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. नोकरदार लोकांचे पगार महिन्याच्या अखेरीस वाढू शकतात. त्याच वेळी वर्षाच्या अखेरीस पदोन्नती होऊ शकते. ज्यांची स्वतःची दुकाने आहेत त्यांना फायदा होऊ शकतो.
 
मकर- भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यवसायात यश मिळू शकते. विवाहित लोक जोडीदारासोबत परदेशात जाऊ शकतात.
 
महेश नवमीचे अचूक उपाय
महेश नवमीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पित करणे शुभ मानले जाते. याने साधकांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.
धार्मिक मान्यतेनुसार महेश नवमीच्या दिवशी घरात रुद्र यंत्राची स्थापना करत महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारते.
भगवान शिवाला धतूरा अती प्रिय आहे. या दिवशी महादेवाला धतूरा अर्पित केल्याने कुंडलीत ग्रह शांत होतात.
 
डिस्क्लेमर: अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रीय श्रद्धेवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.