गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

मूलांक 3 अर्थात विनोदी आणि प्रेमळ स्वभाव

ज्योतिष शास्त्रामध्ये 3 हा अंक बुधाचे प्रतीक आहे. बुध म्हणजे बुद्धी किंवा बौद्धिक क्षमता. याठिकाणी बुध स्वत गुरूच्या रूपात आहे. मुख्य म्हणजे ज्योतिष शास्त्रात दोन गुरू मानले जातात. पहिला गुरु बृहस्पति, दुसरा असुर गुरु शुक्र. परंतु ज्योतिषशास्त्रात बुधाला सौम्य व राजकुमार ग्रह मानले आहे.
 
स्वरूप-
मूलांक 3च्या लोकांचे स्वरूप सामान्य असते. बाह्यत हे लोक सुंदर लोकांच्या श्रेणीत येत नाहीत, परंतु मानसिकदृष्टय़ा ते सुदृढ असतात.
 
व्यक्तित्व-
मूलांक 3च्या लोकांचं व्यक्तिमत्व हळूहळू निखरत जातं. वयानुसार ते अधिकाधिक आकर्षक होत जातं. ही माणसं प्रत्येक गोष्टीचा नैतिकदृष्टय़ा विचार करतात. मूल्यांना त्यांच्या जीवनात विशेष महत्व असतं. शिक्षणाचं त्यांना विशेष महत्व वाटतं. 
 
हे लोक कूटनीतिज्ज्ञ असतात. त्यांना दुसऱ्यांचा हस्तक्षेप सहन होत नाही. सुरुवातीला आर्थिकदृष्टय़ा ते तितकेसे सक्षम नसतात पण पुढे श्रीमंत होतात आणि समाधानी आयुष्य जगतात.
 
स्वभाव-
मूलांक ३चे लोक सामान्यत विनोदी आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. परंतु यांना आपली नाराजी लपवता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक गुप्त शत्रू असतात. हसतमुख स्वभाव त्यांना पुढे जाण्यास लाभदायक ठरतो.
 
गुण-
समाजसेवेची यांना आवड असते. दान करणे, दुसऱ्यांना मदत करणे हे गुण त्यांच्यात असतात. वृध्दावस्थेतही ते सामाजिक कार्यात सक्रीय राहतात.
 
अवगुण-
अतिमहत्वाकांक्षा आणि इतरांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे हे लोक त्यांच्या हितचिंतकांना नाराज करतात. स्पष्टवक्ते असल्यामुळे त्यांच्या गुप्त शत्रूंची संख्या वाढतच जाते. संतापाच्या भरात अपशब्द उद्गारल्यामुळे यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.
 
भाग्य तिथी-
प्रत्येक महिन्याची 3,6,8,12,15,18,21,24 व 27 या तारखा यांच्यासाठी शुभ असतात. आपल्या महत्वाच्या कामांना त्यांनी याच तारखांना सुरुवात करायला हवी. 8, 17 व 26 या तारखा अशुभ ठरू शकतात.
 
भाग्य रंग-
पिवळा, केसरी रंग यांच्यासाठी शुभ असतात. या शिवाय गुलाबी रंगापासून त्यांना विशेष लाभ होऊ शकतो. काळा, निळा व राखाडी रंग यांच्यासाठी शुभ नाहीत.
 
भाग्य दिवस-
गुरुवार, सोमवार आणि मंगळवार मूलांक 3च्या लोकांना फलदायी असतात.
 
करिअर-
अध्यापन, राजकारण आणि व्यवस्थापन त्यांच्यासाठी लाभदायक क्षेत्रं आहेत.
 
भाग्य मंत्र-
ॐ ऐं हीं ऐं बृं बृहस्पतये नम
या मंत्राचा त्यांनी दिवसातून किमान तीनवेळा 108चा जप करायला हवा.
 
भाग्य देव-
बृहस्पतीच्या उपासनेमुळे विशेष फायदे होतात. 
 
भाग्य रत्न-
५ कॅरेटचा पुष्कराज रत्न पहिल्या बोटात घालावा.