मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (08:33 IST)

असे करावे शनिवारचे व्रत

शनिवारी भिकारी, काळा कुत्रा किंवा निर्धन व्यक्तीला उडदाच्या दाळेपासून, काळे तिळापासून तयार झालेले पदार्थ, केळी व तेलापासून बनलेले व्यंजन इत्यादींचे भोजन दान करावे. आणि स्वत:सुद्धा त्याच अन्नाचे 5-6 घास खावे. शनिवारचे व्रत 19, 31 किंवा 51 च्या संख्येत केले पाहिजे. कुठल्याही महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पहिल्या शनिवारापासून ह्या व्रताचा प्रारंभ करावा. 
 
सकाळचे काम आटोपून तेलाची मॉलिश करावी नंतर अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. जर शक्य होत असेल तर काळे किंवा निळ्या रंगाचे वस्त्र नेसावे. अंघोळीनंतर तेल, तिळाचे दान करावे व एक भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काळे तीळ, लवंग, दूध, साखर इत्यादी एकत्र करून पश्चिमदिशेकडे तोंड करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. शनी किंवा हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी जावे आणि यथाशक्ति 'ॐ' प्रां प्रीं प्राँ स: शनये नम:' या मंत्राचा जप करावा. शनिवारी व्रताच्या दिवशी सकाळी कबुतरांना दाणे टाकावेत आणि मुंग्यांच्या वारुळात साखर टाकावी.
 
जितके ती संख्या पूर्ण झाल्यावर शेवटच्या व्रताच्या दिवशी हवन करून भिक्षुक, निर्धन व्यक्तीला भोजन करवून त्यांना काळा किंवा निळा वस्त्र, जोडे-चप्पल, चामडाचे सामान, कम्बल, छत्री, तेल, काळे तीळ, तिळाचे पदार्थ किंवा लोखंडाच्या वास्तूंचे दान करून भोजन करवायला पाहिजे. शनिवारचे व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, येणारे संकट टळतात, व्याधी, रोग दूर होतात.