रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शारीरिक संबंधासाठी कोणती राशी तुमचा सर्वोत्तम पार्टनर असू शकते जाणून घ्या

relationship tips
मेष - या राशीच्या जातकांना खंबीर आणि काहीसे आक्रमक तर वाइल्ड प्रकार आवडतो. ते उत्साहित होण्यासाठी वेळ घेतात. त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवरुन हात फिरवा किंवा केसांमधून बोटे फिरवा. सिंह, तूळ, मिथुन आणि वृश्चिक यांच्याशी सर्वोत्तम पार्टनर ठरतात.
 
वृषभ - वृषभ अधिक कामुक असतात. गोष्टी कशा वाटतात यावर ते अधिक लक्ष केंद्रित करतात आणि परिपूर्ण आनंद अनुभवासाठी धीर ठेवतात. त्यांना स्पर्श, आवाज किंवा गंधाने आकर्षित करता येतं. वृश्चिक, कर्क, कन्या आणि मकर यांच्याशी सुसंगत.
 
मिथुन - विनोदी, जिज्ञासू आणि प्रयोगशील. मिथुन त्यांच्या या कार्यात खूप पुढे निघालेले असतात. मेष, मिथुन, धनु आणि कुंभ यांच्याशी उत्तम संबंध.
 
कर्क - हे खूप कामुक असतात आणि कृती करण्यात अधिक विश्वास ठेवतात. ते खूप उत्कट प्रेमी देखील आहेत आणि संबंधाचा तीव्रतेचा आनंद घेतात. जर तुमची आवड अशी असेल तर त्यांना आकर्षित करा. मीन, वृषभ, सिंह आणि मकर यांच्याशी सुसंगत.
 
सिंह - खऱ्या सिंहाप्रमाणे ते भागीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे आकर्षण वापरतात. ते मजा घेत असले तरी त्यांच्या मोठ्या अहंकाराकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. तूळ, वृश्चिक, मेष आणि धनु राशीशी सुसंगत.
 
कन्या- ते खूप कामुक असू शकतात. त्यांना हळुवारपणे काळजी घेणे आवडते आणि परर्फेक्ट लव्ह सेशनची त्यांना आवड असते. वृषभ, तूळ, मीन आणि सिंह राशीशी उत्तम जुळले.
 
तूळ - या राशीच्या जातकांना मानसिक उत्तेजनाच्या सेशनशिवाय दुसरे काहीही उत्तेजित करत नाही. मजेदार संभाषण, चॉकलेट आणि काही वाइन याद्वारे यांना आकर्षित करता येतं. मेष, मिथुन, सिंह आणि धनु हे सर्वात मस्त पार्टनर ठरतील.
 
वृश्चिक - उत्कट आणि भावनिक. या अति प्रखर लोकांसाठी पूर्ण मूड ऑन ठेवा आणि बघा की असल्ल खेळाडू कोण आहे. रोल प्ले, पॉवर आणि इमोशन त्यांना वेड लावतात. वृषभ, सिंह, वृश्चिक आणि मीन यांच्याशी सर्वोत्तम जुळले.
 
धनू - ते उत्स्फूर्त आणि साहसी आहेत ज्यांना त्यांच्या शारीरिक संबंधात प्रयोगशील व्हायला आवडतं. मग ते रोल प्ले असो, प्रदर्शन असो किंवा खेळणी असो, धनु राशींना हे सर्व आवडतं. वृषभ, मिथुन आणि मेष हे त्यांच्या उर्जेच्या पातळीशी जुळणारे सर्वोत्तम राशिचक्र चिन्हे आहेत.
 
मकर - या राशीच्या जातकांचे पाय आणि गुडघे हे त्यांचे सर्वात संवेदनशील अवयव मानले जातात. त्यांना मोहक होणे आवडते. ते खूप कामुक असतात आणि उच्च पार्टनरची आवड असते. कर्क, वृषभ, मकर आणि कन्या हे मॅच आहेत.
 
कुंभ - ते कल्पक प्रेमी आहेत. त्यांच्या शांत स्वभावामुळे त्यांची फसवणूक करु नये कारण त्यांच्या इच्छा लपलेल्या असतात आणि त्यांना मोहात पाडणे आवडते. तूळ राशीप्रमाणे त्यांनाही मानसिक उत्तेजित व्हायला आवडते. ते कधीकधी खूप कल्पनीय असू शकतात म्हणून त्यांनी तुम्हाला अनपेक्षित काहीही करण्यास सांगितले तर धक्का बसू देऊ नका. मिथुन, कुंभ, धनु आणि कन्या यांच्याशी सर्वोत्तम जोडी.
 
मीन - रोमँटिक आणि संवेदनशील मीन राशींना भागीदारांना आकर्षित करण्यात कधीही अडचण येत नाही. स्वत: आनंदी होण्याऐवजी त्यांना इतरांना संतुष्ट करणे आवडते. प्रेमाच्या बाबतीत ते खूप कल्पनाशील देखील असू शकतात. त्यांच्यावर हळूवारपणे प्रेम करा, त्यांना आनंद द्या आणि त्यांचे मनापासून ऐका. वृश्चिक, कर्क, कन्या आणि तूळ राशीशी सुसंगत.